जनमानसात आदराचे स्थान मिळविलेले तहसीलदार सचिन मुळीक व पोलीस हेडकॉन्स्टेबल गोपाळ साखरे यांचा वाढदिवस संपन्न
मोहोळ ( प्रतिनिधी ) :
मोहोळ शहरातील विविध शासकीय समितीवर कार्यरत व सामाजिक पदाधिकारी यांच्या वतीने अल्पावधीत जनमानसात आदरांचे स्थान मिळविलेले मोहोळचे तहसीलदार सचिन मुळीक व पोलीस ठाणे अंतर्गत कार्यरत असणारे गोपनीय विभागाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल गोपाळ साखरे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला यावेळी नशा मुक्त भारत अभियान सोलापूर जिल्हा ब्रँड अँबेसिडर राजन घाडगे, सिने अभिनेते तथा विधी स्वायसेवक अमोल महामुनी, महिला दक्षता समिती सदस्य यशोदा कांबळे, सुवर्णकार प्रशांत पोतदार आदि. प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी तहसीलदार सचिन मुळीक व पोलीस हेड कॉन्स्टेबल गोपाळ साखरे यांना शाल, श्रीफळ व पुष्पहार देत सत्कार करून पुढील प्रशासकीय सेवेत अतिउच्च पदावर विराजमान होऊन चांगली व दर्जेदार सेवा घडो व उदंड आयुष्य लाभो अशा शुभेच्छा देण्यात आल्या. सर्वांनी व्यक्त केलेल्या आशीर्वादामुळे वाढदिवस अभूतपूर्व झाल्याचे सांगत शासनाची जबाबदारी पार पाडताना लोकांनी व्यक्त केलेल्या भावनामुळे काम करताना लोकांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी सदैव बांधील असल्याचे तहसीलदार सचिन मुळीक यांनी व्यक्त केले.