सोलापूर जिल्हा हमाल मापारी कामगारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा
सोलापूर, प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील हमाल तोलार कामगारांच्या विविध अडचणीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाची निवेदन जिल्हाधिकारी यांना उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार यांना देण्यात आले. यावेळी माथाडी विधेयक 34 त्वरित मागे घ्यावे अन्यथा सोलापूर जिल्ह्यातील हमाल कामगार कामबंद आंदोलन करणार असल्याचा इशारा हमाल मापाडी महामंडळाचे जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे यांनी दिला.सोलापूर जिल्हा हमाल मापाडी कामगारांच्यावतीने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून मुख्यमंत्र्यांना विविध दहा मागण्यांचे निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र राज्य हमाल मापारी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव सोमवारपासून मुंबई येथील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांच्यासोबत राज्यातील इतर 9 कामगार संघटना सहभागी झालेल्या आहेत. या आंदोलनास संपूर्ण महाराष्ट्रासह सोलापूर जिल्ह्यातील हमाल मापाडी कामगार बांधवांनी एक दिवसीय कामबंद आंदोलन करून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. या मोर्चामध्ये माथाडी कायद्याची राज्यभरामध्ये सार्वत्रिक काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी. माथाडी कायदा मोडीत काढण्यासाठी जबाबदार माथाडी विधेयक 34 त्वरित मागे घ्यावे. पणन संचालकांचे दि. 16 जानेवारी 2024 चे परिपत्रक तात्काळ मागे घेण्यात यावे. लोकशाही पद्धतीने सुरू असलेल्या बाजार समितीचे केंद्रीकरण केलेले 2018 चे विधेयक त्वरित मागे घ्यावे. हमाल माथाडी कामगारांच्या पाल्यांना माथाडी मंडळामध्ये प्राधान्याने नोकरीमध्ये घेण्यात यावे. डायरेक्ट वाहतूक व द्वारा पोहोचची काम शासकीय धान्य गोदामातील माथाडी कामगारांकडून करून घेण्यात यावे. गोदामातील माथाडी कामगारांची थकबाकी तात्काळ माथाडी मंडळामध्ये भरण्यात यावी. स्पष्ट शासन आदेश असताना देखील महागाई निर्देशकांची रक्कम गोदामातील माथाडी कामगारांना दिली जात नाही, ती त्वरित मध्ये देण्यात यावी. जिल्ह्यातील वाराईची हमाली कामामध्ये वर्ग करण्यात यावी. माढा येथील शासकीय धान्य गोदामातील कामगारांचे त्वरित काम सुरू करावे, आदी विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत देण्यात आले आहे.सदर मोर्चाची सुरुवात हुतात्मा चार पुतळ्यापासून करण्यात आली. यावेळी महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार घालून घोषणा देण्यात आल्या. या मोर्चामध्ये हमाल मापाडी विविध मागण्यांच्या घोषणा देण्यात आल्या. डॉ. बाबा आढाव तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, माथाडी कायद्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे, वाराईची रक्कम हमालीमध्ये वर्ग केलीच पाहिजे, आदी विविध घोषणांनी सोलापूर शहर दम दमून गेले. या मोर्चामध्ये सोलापूर जिल्ह्यातील हमाल-मापाडी, श्रमजीवी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मोर्चात जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे, जिल्हा सचिव संतोष सावंत, उपाध्यक्ष राहुल सावंत, भीमा सीताफळे, चांदा गफार, नागनाथ खंडागळे आदींनी संबोधित केले .यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सुरेश बागल, उपाध्यक्ष गोरख जगताप, सुखदेव चव्हाण, दत्ता मुरूमकर, लताबाई मुळे, शारदा बनसोडे, यशोदा गायकवाड, बयमा ढावरे, वालचंद रोडगे, राज शेखर काळजी, किरण मस्के, महेंद्र चंदनशिवे, रणजीत शिंदे, सुरेश अक्कलकोटे, शिवलिंग शिवपुरी, गुरु शांती पुराणिक, राजू दनाने, हरिभाऊ कोळी, उत्तरेश्वर गोफणे, श्रीमंत डांगे, सुनिता रोटे, प्रकाश उपाशी, प्रकाश ठोंबे, ज्ञानेश्वर गोसावी, विशाल मस्के, नागनाथ खरात, दत्ता बसवेश्वर, देवेंद्र हुंडेकरी, सिध्दू ढोले, आबाजी शिंदे, नवनाथ सुरवसे, गजानन भुईटे, गणेश कोळी, आंबा कोळी, सातू कोळी आदीसह सोलापूर जिल्ह्यातील हमाल तोलार श्रमजीवी महिला कामगार मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी झालेले होते.