२४’ मराठी न्यूज सोलापूर जिल्हा प्रतिनिधी श्री प्रकाश इंगोले
सोलापूर : राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना समाधानकारक वाढ होईल, असे आश्वासन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महिला बालविकास मंत्र्यांनी दिले आहे. मात्र, या माध्यमातून केवळ दहा टक्के वाढ होणार असल्याचे कळते
ऊयावर कृती समिती तयार नसल्याचे निवेदन राज्य अंगणवाडी कृती समितीने मुख्यमंत्र्यांना दिले आहे.यात त्यांनी म्हटले आहे की, १२ जानेवारी रोजी मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी त्यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला बालविकास मंत्री, अधिकाऱ्यांसमवेत बैठक पार पडली. यात प्रलंबित मागण्या, चांगला मोबाइल व समाधानकारक वाढ २६ जानेवारीपूर्वी दिली जाणार असल्याचे सांगितले
प्रत्यक्ष माध्यमांमध्ये मानधनात १० टक्के वाढ होईल, असे म्हटले आहे.यामुळे अंगणवाडीताईंमध्ये नाराजी पसरली आहे. वास्तविक केरळ, आंध्र प्रदेश, दिल्ली, तामिळनाडू, हरयाणा, तेलंगणा, कर्नाटक येथील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जेवढे मानधन आहे तेवढे मिळावे, ही प्रमुख मागणी आहे. याची पूर्तता नाही झाली तर कर्मचाऱ्यांमध्ये प्रक्षोभ होण्याची शक्यता आहे, याची दखल घ्यावी, असे निवेदनात म्हटले असल्याचे कृती समितीचे सूर्यमणी गायकवाड यांनी सांगितले.या निवेदनावर राज्य कृती समितीचे एम. ए. पाटील, दिलीप उटाणे, शुभा शमीम, भगवान देशमुख यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻८२०८३०८७८७