माढा येथील दिवाणी न्यायालया करिता पदांची निर्मिती.
आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश
२४’ मराठी न्यूज माढा प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून मंत्रीमंडळाच्या झालेल्या बैठकीत माढा येथील वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयाकरिता, दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठस्तर) अधीक्षक, सहायक अधीक्षक, लघुलेखक, वरिष्ठ व कनिष्ठ लिपिक, बेलिफ, कर्मचारी अशा पदांची निर्मिती करण्यात आली आहे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून आमदार मोहिते-पाटील यांनी पक्षकांराच्या सोयींसाठी माढा येथे वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालय मंजूर करूनघेतले होते. परंतु कामकाज पार पाडण्याकरिता आवश्यक त्या पदांची निर्मिती झालेली । नव्हती. पद निर्मितीचा प्रस्ताव विधी व न्याय विभागाकडे प्रलंबितपद निर्मिती अभावी नव्याने मंजूर झालेल्या वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयाचे कामकाज होत नाही. पक्षकारांची देखील मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याने येथे आवश्यक त्या पदांची निर्मिती व या ठिकाणच्या चार न्यायाधीशांचे निवासस्थान बांधण्यासाठी आर्थिक तरतूद व्हावी यासाठी आमदार मोहिते-पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठ पुरावा केला होता .
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻८२०८३०८७८७