कु . आरती संतोष काळे तीन किलो मीटर चालण्याच्या स्पर्धेत राज्यात प्रथम.
गोमेवाडीच्या आरती काळे चा आमदार -जयंतराव पाटील यांच्याकडून गौरव .
24 मराठी न्यूज नेटवर्क
आलेल्या गोमेवाडीच्या कु . आरती संतोष काळे या शालेय विद्यार्थीनीचा माजी मंत्री, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंतराव पाटील यांनी सत्कार करीत गौरव केला . आटपाडी येथील शासकीय विश्रामगृह येथे कु . आरती काळे हिचा शाल, पुष्पगुच्छ देवून आमदार जयंतराव पाटील यांनी सत्कार करून तिचे कौतुक केले . भविष्यातल्या दैदिप्यमान यशासाठी त्यांनी आरतीला शुभेच्छा दिल्या . यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली जिल्हाध्यक्ष अविनाशकाका पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब बापू मुळीक, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेबबापू पाटील, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष हणमंतराव देशमुख, राष्ट्रवादीचे आटपाडी तालुक्याचे नेते भारततात्या पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशचे महासचिव सादिक खाटीक, खानापूर आटपाडी विधानसभा मतदार संघाचे माजी अध्यक्ष ज्येष्ट नेते आनंदरावबापू पाटील, राष्ट्रवादी युवकचे निरीक्षक अरुण आसबे, सांगली जिल्हा महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सौ. सुश्मिताताई जाधव, उपाध्यक्षा अनिताताई पाटील, वंचित बहुजन आघाडीचे नेते अरुणराव वाघमारे, साहेबराव चंदनशिवे, माजी सभापती विजयसिंह पाटील, ज्येष्ट नेते विष्णुपंत चव्हाण पाटील, शहाजीराव पाटील, युवा नेते सौरभभैय्या पाटील, प्रभाकर नांगरे पाटील, समाधान भोसले, सोशल मिडीया तालुका अध्यक्ष किशोर गायकवाड, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष जालींदर कटरे, जयंत पाटील पत संस्थेचे चेअरमन अतुल यादव, खानापूर तालुका महिला राष्ट्रवादी अध्यक्षा सौ सुवर्णा पाटील, माजी सरपंच अभिमन्यू विभूते,अतुल पाटील, बाळासाहेब सागर, रविंद्र लांडगे, विजयराव पुजारी खरसुंडी, सामाजीक न्यायचे राजेंद्र सावंत, गोमेवाडीचे नेते संपतराव पाटील, सौ . विमलताई काळे, साहेबराव कदम, मुन्ना मुलाणी, संतोष काळे, सौ . मालन उर्फ सारीका मेटकरी, श्रीमंत जरग, सोमनाथ देशपांडे, उज्वलाताई सरतापे, सुनिल लेंगरे, इत्यादी जण यावेळी उपस्थित होते . सादिक खाटीक यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते . गोमेवाडी ग्रामपंचायतीच्या धडाडीच्या माजी ग्रामपंचायत सदस्या सौ. विमलताई रामचंद्र काळे यांच्या दोन नाती आणि संतोष रामचंद्र काळे यांच्या दोन जुळ्या कन्या अनुक्रमे आरती आणि पुजा यांनी यापूर्वी तालुका,जिल्हा, विभाग स्तरावरील अनेक स्पर्धा गाजविल्या आहेत. काही दिवसापूर्वी सातारा येथे झालेल्या विभागीय स्पर्धेत कु . आरती काळे ने दुसरा क्रमांक मिळवित राज्यस्तरीय स्पर्धेत प्रवेश निश्चित केला होता तर पुजा काळे ने विभागीय स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावला होता . क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीने दि . ३० जानेवारी रोजी या स्पर्धा पार पडल्या . बालेवाडी पुणे येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत ३ किलोमीटर चालण्याच्या स्पर्धा प्रकारात कु . आरतीने राज्यात प्रथम क्रमांक पटकावत लक्षवेधी यश मिळविले. कु . आरती काळे ही श्री . गजानन हायस्कुल गोमेवाडी ची विद्यार्थीनी आहे .
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻८२०८३०८७८७