नंदुरबार : ११ गर्भवती महिलांना घेऊन जाणारी रुग्णवाहिका उलटली.
धक्कादायक! 11 गरोदर माता घेऊन जाणाऱ्या ऍम्ब्युलन्सचा भीषण अपघात
24 मराठी न्यूज नेटवर्क
गर्भवती महिलांची तपासणी करून त्यांना घरी नेणारी रुग्णवाहिका अचानक उलटली. यात गर्भवती महिलांसह चालक जखमी झाला. ही घटना शहादा तालुक्यातील लोणखेडा येथील महाविद्यालयासमोर बुधवारी (दि.१ फेब्रुवारी) घडली. गर्भवती महिलांना गंभीर दुखापत झाली आहे. सुदैवाने मोठा अनर्थ टळला.मिळालेल्या माहितीनुसार, धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागातील तेलखेडी आरोग्य केंद्रात ११ गर्भवती महिलांना तपासणीसाठी रुग्णवाहिकेतून आणण्यात आले होते. महिलांना परत घरी नेताना ही रुग्णवाहिका लोणखेडा येथे महाविद्यालयासमोर अचानक उलटली,
मोठा आवाज आणि महिलांच्या किंकाळ्या ऐकून नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी महिलांना सुखरूप बाहेर काढले. तातडीने त्यांना शहादा जिल्हा उपरुग्णालयात दाखल करण्यात आले.तीन महिलांना फ्रॅक्चर झाले आहे. तर दोन-तीन महिलांच्या डोक्याला मार बसला आहे. दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच आरोग्य विभागाच्या आणि पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी शहादा उप रुग्णालयात धाव घेतली.
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻८२०८३०८७८७