महूद मध्ये मोफत नेत्र तपासणी व मोफत शस्त्रक्रिया शिबिर संपन्न.
125 लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला
24 मराठी न्यूज नेटवर्क
पंढरपूर : महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक चळवळीचा मानबिंदू असणाऱ्या संजीवनी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने व बुधरानी हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच महूद तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथे शिबिर संपन्न झाले. संजीवनी फाउंडेशन चे चेअरमन डॉ.ज्ञानेश्वर सानप साहेब व कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर येथील प्रा.डॉ. दत्तात्रय काळेल यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीमध्ये 125 लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी मा. आर्यन संजय नरळे, जिल्हा उपाध्यक्ष संजीवनी फाउंडेशन सोलापूर व महूद चे युवा नेते रोहन येडगे तसेच आर्यन नरळे मित्र मंडळ यांनी परिश्रम घेतले .या शिबिरामध्ये महूद चे ज्येष्ठ नेते बाळासाहेब पाटील चंद्रकांत देशमुख अंकुश येडगे तसेच चंद्रकांत सरतापे व मधुकर हेटकळे यांच्यासह इतर बहुसंख्य लोकांनी शिबिरामध्ये सहभाग घेऊन सदिच्छा दिल्या. या सामाजिक कार्याचे ग्रामीण भागातून विशेष कौतुक होत आहे.
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻८२०८३०८७८७