धामणीत जेष्ठ दांपत्याचे हातपाय बांधून चाकुने धमकाऊन पाच तोळे सोन्याचे दागिने व रोख पाच हजार रुपयांची चोरी.

24 मराठी न्यूज पुणे प्रतिनिधी
आंबेगाव येथील जाधवमळ्यात काल गुरुवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास अज्ञात तीन चोरट्यांनी घराच्या दरवाजाला लाथ मारून दरवाजाची कडी तोडून गोविंद भगवंत जाधव (वय ७७ वर्ष ) व नंदा गोविंद जाधव ( वय ७० वर्ष ) या जेष्ठ दांपत्याचे हातपाय बांधून धक्काबुक्की करत चाकुन धाक दाखवून अंगावरील पाच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व रोख पाच हजार रुपये असा एकूण सुमारे अडीच लाख रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला आहे जाताना घराला बाहेरून कुलूप लाऊन तसेच घराची लाईट तोडून गेल्याने आज शुक्रवारी सकाळी सहा वाजता हि घटना उघडकीस आली.येथील जाधवमळ्यात पोंदेवाडी रस्त्यावर गोविंद जाधव यांचे एकांटी घर आहे. जवळ दुसरे कोणतेच घर नाही गोविंद जाधव व त्यांची पत्नी नंदा हे दोघेच राहतात. त्यांची मुले व नातवंडे बाहेरगावी असतात काल गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास दोघे तरुण लकी ड्रॉ चे कुपन विकण्याच्या बहाण्याने जाधव यांच्या घरी आले होते. कदाचित त्यांनी त्यावेळी घराची पाहणी केली असेल कि घरात दोघां शिवाय दुसरे कोणी नाहीजवळपास दुसरे घर हि नाही यांच्या अंगावर दागिनेही आहे. रात्री सुमारे साडेअकरा वाजता अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाला लाथ मारून दरवाजाची कडी तोडून आत येऊन या जेष्ठ दांपत्याचे हातपाय बांधून चाकूचा धाक दाखवत धक्काबुक्की करत धमकाऊन गोविंद जाधव यांच्या हातातील एक दीड तोळे वजनाची सोन्याची अंगठी व दुसरी अर्धा तोळे वजनाची सोन्याची अंगठी तसेच नंदा गोविंद जाधव यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, अर्धा तोळे वजनाची सोन्याची अंगठी व अर्धा तोळेचा कानातील दागिना, एक नथ तसेच घरातील रोख पाच हजार रुपये असा एकूण सुमारे अडीच लाख रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला आहे.चोरट्यांनी जाताना जाधव यांच्या मोबाईल मधील बॅटरी काढून घेतली, घराला बाहेरून कुलूप लाऊन घराच्या लाइटची वायर तोडून चोरटे पसार झाले. बाहेरून कुलुप लावल्याने या जेष्ठ दांम्पत्यास काही हि करता आले नाही.रात्रभर ते मोठमोठ्याने ओरडुन आवाज देत होते परंतु जवळ दुसरे कोणतेच घर नसल्याने कोणालाही आवाज आला नाहीसकाळी सहा वाजण्याच्या सुमारास काही अंतरावर घर असलेले सुनील गुलाब जाधव यांना गोविंद जाधव यांच्या ओरडण्याचा आवाज आल्याने त्यांनी जाऊन पाहिल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला सुनील जाधव यांनी माजी सरपंच सागर जाधव,वसंतराव जाधव, ग्रामपंचायत सदस्य प्रतिक जाधव , माजी ग्रामपंचायत सदस्य आनंदा जाधव व कैलास जाधव यांना बोलावून घेतले तसेच पारगाव कारखाना पोलीस ठाण्यात भ्रमणध्वनीवरून माहिती दिल्यानंतर,पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे व पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे करत आहे.

*आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१
ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा
८२०८३०८७८७*