नगर वाचन मंदिर पंढरपूर येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
24 मराठी न्यूज पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर-नगर वाचन मंदिर पंढरपूर येथे दिनांक 19, 2 ,23 रोजी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन पोस्ट प्रमुख श्री आकाश मिसाळ यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार श्री लखन साळुंखे उपस्थित होते.
यावेळी सर्वांनी प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले त्याचबरोबर सर्वांनी शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत परिसर दुमदुमून गेला. यावेळी नवीन राज्य गीत जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा या गीताचे सर्वांनी गायन केले. यावेळी जेष्ठवाचक पा वा उत्पात शशिधर कुलकर्णी नारायण वाटाणे मोहीकर शिवाजी बंदपट्टे निलखे कुलकर्णी वाचक उपस्थित होते यावेळी कर्मचारी श्री पाठक विश्वनाथ मिसाळ राजकुमार आवताडे अनेक वाचक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संस्थेचे सदस्य श्री पा म अल्लापुरकर यांनी केले
*🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻८२०८३०८७८७*