लोटस इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज अँड आय.सी एम.एस.कॉलेजमध्ये शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा. जी
24 मराठी न्यूज पंढरपूर प्रतिनिधी श्री संपत लवटे
श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित,स्वाईप अंतर्गत ३९४ वा शिवजन्मोत्सव उत्साहाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या शुभप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून स्कूलच्या प्राचार्या.डॉ. जयश्री भोसले उपस्थित होत्या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने आणि राज्य गीत “जय जय महाराष्ट्र माझा”याने सुरू झाली. शिवजन्मोत्सव कार्यक्रमाचे विशेष गोष्ट म्हणजे ज्युनिअर आणि आय.सी.एम.एस महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या दिमाखात शिवरायांची मिरवणूक पालखीतून काढली शिवरायांच्या मूर्तीचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.जयश्री भोसले यांनी केले.या कार्यक्रमाप्रसंगी नर्सरी ते बारावी च्या विद्यार्थ्यांनी भाषणे केली. तर काही विद्यार्थ्यांनी पोवाडाचे सादरीकरण केले तर इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी “शिवाजी महाराज अफजल खान भेट” नाटक सादरीकरण करून सर्व शिवभक्तांची मने जिंकली तसेच इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी लाठीकाठी हा शिवकालीन एक युद्ध प्रकार सादर करून शौर्य पराक्रमाची गाथा सर्वांसमोर मांडली अनेक विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवरायांची वेशभूषा परिधान केली होती तर विद्यार्थिनींनी राजमाता जिजाऊंची वेशभूषा परिधान केली होती हा शिवजन्मोत्सव कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व विभाग प्रमुखांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक संपत लवटे शिक्षिका प्रज्ञा कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन अंजली मोरे यांनी केले. या शिवजन्मोत्सव कार्यक्रमाच्या शुभप्रसंगी संस्थेचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे अध्यक्ष एच. एम.बागल उपाध्यक्ष बी.डी. रोंगे, खजिनदार दादासाहेब रोंगे यांनी शुभेच्छा दिल्या
*🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻८२०८३०८७८७*