पंढरपूर राष्ट्रवादी काँग्रेसच्यातालुकाध्यक्ष पदी संजय बाबर यांचीनिवड करण्याची मागणी.
24 मराठी न्यूज पंढरपूर धीरज साळुंखे
पंढरपूर ः पंढरपूर तालुक्यातील राष्ट्रवादी काॅग्रेस पाटीचे तालकुा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी तालुक्यातील भाळवणी येथील पक्षाशी एकनिष्ठ काम करीत असलेले माजी तालुका उपाध्यक्ष संजय बाबर हे राष्ट्रवादीशी एकनिष्ठ आणि प्रामाणिक काम केल्याने तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांना मिळणार असल्याची चर्चा ग्रामीण भागातून होत आहे. पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब अजीतदादा पवार व सुप्रियाताई सुळे यांच्या विचारांशी निगडीत असलेल्या बाबर यांचे तालुक्यात चांगला जनसंपर्कर् आहे. पंचायत समिती , जिल्हा परिषदेच्या वेळी त्यांना स्वतः झोकून काम केले आहे.
राष्ट्रवादी काॅग्रेस पाटीचे तालुक्यातील धुरा वेळोवेळी सांभाळत त्यांनी लोकसभेला भाळवणी गटातून उत्कृष्ट नियोजन करीत अपेक्षे पेक्षा जास्त मतदान मिळवून दिल्याने वरिष्ठांनी त्यांचे कौतुक केले होते. मित्र पक्षासोबत विधानसभा सांगोला मतदार संघातही त्यांनी चांगले काम केले असल्याने श्री. संजय बाबर यांच्या नावाची चर्चा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमधून आहे. राष्ट्रवादीशी त्यांची जवळीक असल्याने त्यांचे नाव फिक्स झाले असल्याची माहीती विश्वसनीय गोटातून मिळाली आहे. श्री.संजय बाबर यांच्या पाठीशी युवक व मा श्री पवार साहेबांवर प्रेम करणारे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आहेत व संघटन कौशल्य असल्याने ग्रामीण भागातील अडचणी सोडविण्यासाठी त्यांचा नेहमीच प्रयत्न राहीला आहे.
*🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻८२०८३०८७८७*