महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ व इतर कर्मचारी संघटना यांचे जुनी पेन्शन योजना व इतर विविध प्रलंबित मागण्यांकरिता बेमुदत धरणे आंदोलन सुरु.
24 मराठी न्यूज जिल्हा प्रतिनिधी प्रकाश इंगोले,
आज दि.१४/०३/२०२३ रोजी पासुन पंचायत समिती पंढरपूर अधिनस्त सर्व संवर्गीय अधिकारी व कर्मचारी यांचे जुनी पेन्शन योजना व इतर विविध प्रलंबित मागण्यांकरीता महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ व इतर सर्व संघटना यांचे वतीने बेमुदत धरणे आंदोलन सुरु करण्यात आलेले असून, जोपर्यंत शासन मागण्या मान्य करीत नाही तोपर्यंत हे आंदोलन सनदशीर मार्गाने असेच निरंतर चालू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
यावेळी महासंघाचे मानद जिल्हाध्यक्ष तथा प्रशासन अधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. प्रफुल्ल माळी यांनी जुनी पेन्शन योजना लागू झाल्यानंतरचे फायदे याची सविस्तर माहिती सांगितली व त्यासाठी सर्वांनी एकत्रित लढा देवून शासना कडून जुनी पेन्शन योजना लागू झाल्याशिवाय काम बंद आंदोलन मागे घ्यायचे नाही असे सर्वांना आवाहन केले.
व यावेळी महासंघाचे मानद जिल्हा उपाध्यक्ष तथा ग्रामसेवक युनियन चे जिल्हा अध्यक्ष श्री.शरद भुजबळ, महासंघाचे सरचिटणीस श्री. रमेश कोळी, तसेच महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे पंढरपूर तालुका अध्यक्ष श्री. धन्यकुमार काळे व इतर पदाधिकारी / सदस्य, लिपिकवर्गीय संघटनेचे तालुका अध्यक्ष श्री. प्रल्हाद मोरे व कर्मचारी युनियन संघटनेचे तालुका अध्यक्ष श्री. शहाजहान तांबोळी व पदाधिकारी / सदस्य व विविध संघटनांचे अध्यक्ष व पदाधिकारी / सदस्य ई. मान्यवर उपस्थित होते.
*🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻८२०८३०८७८७*