वर्षभरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या नित्यपूजेचे बुकिंग फुल्ल.
मंदिर समितीला ९४ लाख रुपयांचे उत्पन्न
24 मराठी न्यूज पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या • डिसेंबर २०२३ अखेर सर्व नित्य पूजेची नोंदणी पूर्ण झाली आहे. या पूजेच्या माध्यमातून मंदिर समितीला ९४ लाख रुपये उत्पन्न मिळाले असल्याची’ •आणि दररोज होणाऱ्या तुळशी अर्चन पूजेलाही मोठा प्रतिसाद मिळत असल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी – दिली आहे.श्री विठ्ठल रूक्मिणी मातेची दररोज पहाटे नित्य पूजा केली जाते. नोंदणी करून ठरलेल्या तारखेला संबंधित भाविक आणि त्यांच्या दहा ते बारा नातेवाईकांना नित्य पूजेसाठी सकाळी मंदिरात प्रवेश दिला जातो. नित्य पूजा सुरू असताना देवाच्या मूर्तीवर केशर पाण्याने स्नान घालण्याची संधी भाविकांना मिळते. रुक्मिणी मातेस हळद, कुंकू लावून, देवाला पेढे नैवेद्य. आणि फळांचा महाप्रसाद पूजा करणाऱ्यांच्या हस्ते दाखवला जातो. त्यामुळे या नित्य पूजा करण्यासाठी भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळत असते
*३१० नित्यपूजेची नोंदणी *
वर्ष भरात होणाऱ्या चार प्रमुख यात्रा आणि त्यांचा कालावधी वगळता ३१० दिवस श्री विठ्ठलाच्या नित्य पूजा नोंदणी केल्या जातात. तसेच रुक्मिणी मातेकडे १५० च्या दरम्यान पूजा नोंदणी होत असतात. यावर्षी जानेवारी ते डिसेंबर २०२३ या वर्षभरात होणाऱ्या श्रीविठ्ठलाच्या • ३१० नित्य पूजेची नोंदणी पूर्ण झाली आहे. या नित्य पूजेतून मंदिर समितीला ९४ लाख रुपयांचे उत्पन्न मंदिर समितीला मिळाले असल्याची माहिती पुदलवाड यांनी दिली.असतो.
*🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻८२०८३०८७८७*