मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील शेतकरी बांधवांचे शेती विषयक समस्या
24 मराठी न्यूज , सोलापूर
जिल्हा प्रतिनिधी प्रकाश इंगोले
मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील शेतकरी बांधवांचे शेती विषयक समस्या डी.पी. खराब होणे, नवीन शेती पंप, विज कनेक्शन जोडणे पेंडिंग असणे यात्रा कालावधीमध्ये पुरेशी वीज उपलब्ध नसणे याबाबत पंढरपूर मंगळवेढा विधानसभा लोकप्रिय आमदार माननीय समाधान दादा आवताडे साहेब यांनी शासकीय विश्रामगृह मंगळवेढा येथे वीज वितरण, विद्युत पारेषण अधिकारी यांचे आढावा बैठक बोलावून शेतकरी जनता दरबार भरवून शेतकरी बांधवांच्या समस्या ऐकून घेतल्या या बैठकीसाठी सोलापूर, पंढरपूर, मंगळवेढा येथील महावितरण विद्युत पारेषण कंपनीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये विविध शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यात आल्या, त्यापैकी महावितरण आपल्या दारी या योजनेमधून अंदाजे 2000 शेतकऱ्यांनी कोटेशन भरून दहा वर्षे झाली तरी अद्याप शेतकऱ्यांच्या विहिरीवर लाईट कनेक्शन मिळालेले नाही. उप- विभागीय महावितरण कार्यालय मंगळवेढा कार्यालयास शेतकरी हेलपाटे मारून वैतागलेले आहेत
अधिकारी म्हणतात, महावितरण आपल्या दारी या योजनेला शासनाचे अनुदान मिळत नाही. अनुदान आल्यानंतर कामे होतील गरीब अल्पभूधारक शेतकऱ्यांनी किती वर्षे वीज कलेक्शन मिळण्याची वाट पाहायचे? खाजगी काम करून घ्या म्हणतात. खाजगी कॉन्ट्रॅक्टर कडून काम करायचे म्हटले तर एका पोलचा खर्च 20,000/- रुपये सांगतात. गोरगरीब शेतकऱ्यांना खाजगी काम करून घेणे परवडणारे नाही. SC,ST या मागासवर्गीय समाजासाठी विद्युत वितरण कंपनी लवकर कामे करून देते, तसे NT(B) या भटक्या समाजासाठी लवकर कामे करून देण्याची व्यवस्था का नाही? NT(B) हा नाथपंथी डवरी गोसावी भटका समाज तर SC,ST या मागासवर्गीय समाजापेक्षाही दरिद्री समाज आहे. मग अशा समाजासाठी लाईट कनेक्शन मिळण्याची शासनाने तरतूद करावी. याप्रकरणी दाद मागणेसाठी हुन्नूर येथील शेतकरी शिवाजी रामा भोसले यांनी आपली कर्म कहानी माननीय आमदार समाधान दादा आवताडे साहेब यांचे कडे निवेदन देऊन मांडले. सदर भोसले यांनी दिनांक 5.3.2014 रोजी 5200/- रुपये कोटेशन भरून वीज बोर्डाकडे वीज मागणीचा अर्ज दाखल करून दहा वर्षे होऊन सुद्धा त्यांना अद्याप वीज कनेक्शन दिले गेले नाही. यापेक्षा गंभीर बाब म्हणजे वीज बोर्डाने वीज कनेक्शन न देता व वीज पुरवठा न करता कोटेशन भरलेल्या तारखेपासून आजपर्यंतचे विजेचे बिल आकारून त्यांना मानसिक त्रास दिलेला आहे. भोसले यांनी कुठूनही वीज जोडणी करून घेतलेली नाही व वीज वितरण कंपनीची एक रुपयाची सुद्धा वीज वापरलेले नाही तरी सुद्धा त्यांच्या पत्नी सुशिला शिवाजी भोसले रा. हुन्नूर त्यांच्या नावे एक लाख रुपये वीज बिल जमा झालेले आहे. वीज पुरवठा न करता व वीज न वापरता अशा शेतकऱ्याकडून विजेचे बिल घेणे हे कोणत्या कायद्यात बसते असा जाहीर प्रश्न श्री. शिवाजी भोसले यांनी वीज अधिकाऱ्यांसमोर मांडलेला आहे व माननीय आमदार समाधान दादा आवताडे साहेब यांच्यासमोर मांडलेला आहे सदर प्रकरणी माननीय आमदार समाधान दादा आवताडे साहेब यांनी वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचे हे प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी व कार्यवाही करण्याचे आदेश आज दि.7.4.2023 रोजी मंगळवेढा येथील रेस्ट हाऊस या ठिकाणी दिले.
*🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻८२०८३०८७८७*