शेतकऱ्याने ,द्राक्ष बागेवरती फिरवली कुऱ्हाड.
24 मराठी न्यूज पंढरपूर
पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील द्राक्ष उत्पादना बाबतीत सोलापूर जिल्ह्यातील नव्हे तर राज्यात तसेच देशविदेशातील बाजार पेठ मध्ये पाठविलेल्या जातात परंतु गेल्या तीन वर्षांपासून द्राक्षास पाहिजे तेवढा दर मिळत नसल्यामुळे तसेच द्राक्षाच्या बागासाठी लागणारी औषधाचे दर गगनाला भिडल्यामुळे आणि वाढती महागाई मुळे द्राक्ष पिक परवडेनासे झाले आहे.तसेच एकडे मात्र शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे आणि घेतलेल्या बँकांच्या कर्जाचे हप्ते वेळेवर जात नसल्याने तरुण युवक शेतकरी नवनाथ पिलवे यांनी चालू पीक असलेल्या द्राक्ष बागेवरती कुराड फिरवली असुनचालू हंगामातील द्राक्षाला पाहिजे तसा दर मिळत नसल्यामुळेद्राक्ष फवारणीसाठी आणलेल्या औषधांचा खर्चसुद्धा निघत नसल्यामुळे अखेर वैतागून शेतकऱ्यांनी द्राक्षाच्या बागातोडण्यास सुरुवात केली आहे.द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना शासनाकडून योग्य तो हमीभाव मिळावा अशी सर्वसामान्य शेतकऱ्यांची मागणी असून द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांच्या द्राक्ष पिकास व्यापाऱ्याकडून योग्य भाव मिळत नसल्यामुळे आणि व्यापार्याच्या मनमानी कारभारामुळे हातात तोंडाशी आलेलं पिक कुठे घालवायचे म्हणून शेतकरी हा व्यापार आणि मागितलेल्या त्या दराने आपली द्राक्ष द्यावी लागतात परंतु त्या भागामुळे झालेल्या कर्जाचा डोंगर कसा फेडायचा या विचारात पडलेला असतो त्यामुळे सर्व द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांची शासनाला एकच मागणी आहे की शेतकऱ्यांना जगू तर द्या नसेल तर मरू द्याशासनाने द्राक्ष पिकास योग्य हमीभाव द्यावा अशी मागणीला जोर धरत आहे.
*🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻८२०८३०८७८७*