अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या प्रमाणात परिचारिका दिन साजरा.
24 मराठी न्यूज पंढरपूर/ प्रतिनिधी
पंढरपूर – माणसाच्या आरोग्याची काळजी घेणारा सर्वात महत्त्वाचा घटक डॉक्टर व नर्से असून रुग्णाची मनापासून सेवा करणाऱ्या परिचारिका ह्या सर्वात महत्त्वाचा घटक वेळेचे कुठलेही त्यांना बंधन नाही येणाऱ्या रुग्णाची मनापासून वैद्यकीय सेवा देणाऱ्या या परिचारिका कोणताही भेदभाव न करता असते काळजीने रुग्णाची सेवा करतात त्यांच्या सेवावरती सेवेप्रति कृतज्ञता म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने शहरातील विविध हॉस्पिटल लॅब या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या नर्सेस ना जागतिक नर्सेस डे निमित्त गुलाब पुष्प देऊन त्यांच्या प्रति आदर व्यक्त केला अखिल भारतीय ग्राहक संघटना ग्राहकांच्या हितासाठी झटण्याबरोबरच समाजातील विविध क्षेत्रातील काम करणाऱ्या व्यक्तींचा आदर भावाप्रती कार्यक्रमांद्वारे यथोचित सन्मान करत आलेली आहे अनेक नर्सरी यांचा सन्मान करताना आमचेही कोणीतरी घेणारे आहेत असा भाव व्यक्त केला व धन्यवाद दिले आज परिचारिका दिनानिमित्त विविध खाजगी हॉस्पिटल मध्ये जाऊन परिचारिकांना शुभेच्छा देण्यात आल्या व त्यांच्याबद्दल आदर व्यक्त केला. तसेच उपजिल्हा रुग्णालय,पंढरपूर येथे विविध सामाजिक संस्था आणि ग्राहक पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या प्रमाणात परिचारिका दिन साजरा केला गेला.याप्रसंगी जिल्हा संघटक दीपक इरकल, पंढरपूर तालुका उपाध्यक्ष नंदकुमार देशपांडे, सदस्य देवल साहेब,मकरंद पदमवार, तालुका संघटक महेश भोसले उपस्थित होते.
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶*आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com*