सोलापूर शहरात भवानी पेठ येथे सरताज मुलाणी यांच्या घराजवळ लावलेली दुचाकी मध्येरात्री दोघांनी पेटवून दिल्याचा प्रकार घडला.
24 मराठी न्यूज सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
बार्शी शहरात भवानी पेठ येथे सरताज मुलाणी यांच्या घराजवळ लावलेली दुचाकी रात्री दोघांनी पेटवून दिल्याचा प्रकार घडला दरम्यान फिर्यादी महिलेने आरडाओरड करताच त्या दोघांनी तेथून पळ काढला. या घटनेत गाडीचे ४० हजारांचे नुकसान झाले असून बार्शी शहर पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.ही घटना ११ मे रोजी रात्री १२ वाजेच्या दरम्यान घडली असून याबाबत सरताज यांची आई हसीना दस्तगीर मुलाणी (५०, रा. भवानी पेठ, बार्शी) यांनी बार्शी पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी उमेश शेट्टी व सोनू वायकर (दोघे रा.मंगडे चाळ, बार्शी) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार फिर्यादीचा हसीना यांचा मुलगा सरताज याने दिवसभरातील काम संपवून फिर्यादी रहात असलेल्या बोळात (एम.एच. १३/ डी. पी. ४९२३) ही दुचाकी लॉक करून ठेवली होती जेवण आटोपून सारेजण झोपी गेले आणि रात्री १२ वाजण्याच्या सुमारास घराबाहेर कशाचा तरी आवाज येताच हसीना बाहेर आल्या. पाहिले असता वरील दोघेजण दुचाकी जवळ उभे राहून आग लावत असल्याचे दिसले. तिने दोन्ही मुलाला आवाज देऊन बाहेर बोलावताच समाजकंठकांनी तेथून पळ काढला. दरम्यान दुचाकी जळून खाक झाली. याचा पुढील तपास पोलीस हवालदार भांगे करत आहेत. सूत्राकडून माहिती मिळालेली.
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶*आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com*