कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचा ९७.४१ टक्के निकाल
24 मराठी न्यूज पंढरपूर तालुका प्रतिनिधी श्री प्रकाश इंगोले
पंढरपूर : इयत्ता बारावीच्या निकालात रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील कला, विज्ञान, वाणिज्य, वोकेशनल विभागाचा ९७.४१ टक्के इतका निकाल लागला.वाणिज्य विभागातील साईनाथ अभय अंभोरे, अमेय जयंत आयाचित, प्रणव प्रदीप हराळे, तनवी संजय नलवडे, गायत्री पाटील या विद्यार्थ्यांनी बुक कीपिंग अॅण्ड अकाउंटन्सी मध्ये शंभर पैकी शंभर गुण प्राप्त केले. विज्ञान शाखेचा ९९.७३ टक्के निकाल लागला. यामध्ये यश सावळकर (प्रथम), श्रद्धा उत्पात (द्वितीय), सुहासिनी खडके (तृतीय), कला विभागाचा ९१.७० टक्के निकाल लागला यामध्ये सोनाली सूर्यवंशी (प्रथम), अमृता मुळे (द्वितीय), आकांक्षा आप्रे (तृतीय). वाणिज्य विभागाचा ९९.४६ टक्के निकाल लागला. यामध्ये अमेय आयाचित (प्रथम), सायली कोहळे (द्वितीय), नीलम रोंगे (तृतीय). वोकेशनल विभागाचा ९८.११ टक्के निकाल लागला. जोहिता सगर (प्रथम), सगर (द्वितीय) आणि कल्याण मिसाळ (तृतीय).यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे, उपप्राचार्य प्रा. बी. आर. शिंदे, पर्यवेक्षक प्रा. युवराज अवताडे, प्रा. आर. एस. मुसळे, प्रा. पी.एम. भोसले, कार्यालयीन प्रमुख पारधी, शिवाजीराव लोभे यांच्यासह सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, कार्यालयीन सेवकांनी कौतुक केले.
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com