पंढरपूर नगरपालिकेवर भाविकांकडून कौतुकाचा वर्षाव, स्वच्छता अभियान जोरदार सुरु
यात्रा कालावधीत दररोज ६० ते १२० टन कचरा गोळा केला जातो
24 मराठी न्यूज नेटवर्क
पंढरपूर शहरामध्ये नुकतीच दि.२९/०६/२०२३ रोजी यात्रा संपन्न झाली या यात्रा कालावधीत अंदाजे १२ ते १५ लाख भाविक पंढरपूर मध्ये दाखल झाले आहेत . यात्रा कालावधी पूर्वी व यात्रा कालावधीनंतर भाविकांना चांगल्या सेवा सुविधा मिळाव्यात म्हणून नगरपरिषद आपल्या स्तरावर योग्य ते प्रयत्न करत असते खरे आवाहन असते ते एकादशी संपल्यानंतर निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे कारण रस्त्यावर टाकलेल्या कचऱ्यापासून शहरात नागरिकांना व भाविकांना मोठ्या प्रमाणात दुर्गंधी चा त्रास होत असतो याची दखल घेत मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे व प्रांत अधिकारी गजानन गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष नियोजन करून आरोग्य विभागातील सर्व सफाई कर्मचारी मुकदम शिपाई आरोग्य अधिकारी यांना अतिशय नियोजनबद्ध कार्यक्रम आखून दिला आहे त्यानुसार दोन दिवसात संपूर्ण पंढरपूर शहर हे कचरा मुक्त करण्याचे प्रयत्न नगरपरिषद करत आहे त्याचे नियोजन खालील प्रमाणे केले असून पंढरपूर शहराचे मंदिर परिसर, संतपेठ, स्टेशन रोड जुनिपेठ, गोविंदपुरा नवपेठ, इसबावी मनिषा नगर, गणेश नगर, पालखी मार्ग व पालखी तळ असे साफ सफाई साठी भाग करणेत आले आहेत.
या विभागात रस्ता झाडणे, कचरा भरणे, गटारी स्वच्छता, भुयारी गटार स्वच्छता, कचरा वाहतुक, शौचालय स्वच्छता इ. साठी १५०० सफाई कर्मचारी नेमण्यात आलेले आहेत. तसेच या यात्रा कालावधीमध्ये सोलापूर महानगरपालिका, सांगोला, मंगळवेढा, बार्शी, कुर्डवाडी या नगर परिषदेचे सफाई कर्मचारी हे सुद्धा मदत करत आहेतयात्रा कालावधीमध्ये दशमी व एकादशी दिवशी प्रदिक्षणा मार्ग प्रदिक्षणा मार्गाच्या आतील असलेली रस्ते, नदी पात्राकडे जाणारी सर्व रस्ते या ठिकाणी कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी किंवा इतर गाड्या जाऊ शकत नाहीत यामुळेच या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग हे द्वादशीला दिसू लागतात तसेच या रस्त्यावर अनेक वाहने पार्क केलेली असतात त्यामुळे कचरा गोळा होऊ शकत नाही आणि म्हणून हा पडलेला कचरा त्वरित उचलला जावा म्हणून योग्य ती नियोजन केले असून या कामी स्वच्छतेच्या कामासाठी ठेकेदार पद्धतीने व कायम असे १५०० सफाई कामगारांची नियुक्ती करणेत आली आहे. या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शहर भाग, उपनगरे , पत्राशेड, दर्शनबारी रस्ता, नदी वाळवंट, ६५ एकर परिसर वाखरी पालखी तळ येथे स्वच्छता करण्यात येत आहे यात्रा कालावधीमध्ये आरोग्य विभागाकडील आरोग्याधिकारी, आरोग्य निरीक्षक, १० वार्ड शिपाई, मुकादम, १५०० सफाई कामगार हे दिवस-रात्र काम करीत आहेत.
यात्रा कालावधी मध्ये शहरातील व उपनगरातील सर्व मैदाने, नदी परिसर, ६५ एकर भक्तिसागर, पत्राशेड दर्शनबारी रोजचे रोज स्वच्छ व निर्जंतुक करणेकामी दररोज शहरात मॅलेथॉन पावडर फवारली जात आहे तसेच कचऱ्यावर व इतर घाणीचे ठिकाणी दुर्गधीनाशक विघटनकारी बायोकल्चर ७ ब्लोअर मशिन मार्फत शहर, नदी वाळवंट, पत्राशेड, दर्शनबारी रस्ता, ६५ एकर, उपनगरे या भागात फवारण्यात येत आहेशहरातील कचरा उचलणे साठी नगरपालिकेची २ डंपिंग ट्रॉल्या, २ कॉम्पॅक्टर, 1 कंटेनर कॅरीअर अशी ५ वाहने तसेच जिल्ह्यातील आलेल्या नगर परिषदेचे १० ट्रॅक्टर, जे.सी.बी., टिपर व डंपिंग द्वारे दररोज ६० ते १२० टन कचरा यात्रा कालावधीत उचलण्याचे काम युध्दपातळीवर हाती घेण्यात आले आहे तसेच घर स्तरावर कचरा गोळा करणे करीता ४१ घंटागाड्यांचा वापर करण्यात येत आहे. यात्रा कालावधीत या घंटागाड्या सकाळी व रात्री अशा दोन वेळेस घरोघरीचा कचरा गोळा करत असल्याची माहिती मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी दिली शहरात लवकरात लवकर स्वच्छता व्हावी व सर्व कचरा गोळा करून शहर लवकरात लवकर कचरा मुक्त व्हावे म्हणून नियोजनबद्ध कार्यक्रम आखला असून या कामी उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर, आरोग्य अधिकारी शरद वाघमारे, आरोग्य निरीक्षक नागनाथ तोडकर, सर्व शिपाई मुकदम सफाई कर्मचारी प्रयत्नशील आहेत.
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com