महाराष्ट्रात पुन्हा राजकिय भूकंप: अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ !
24 मराठी न्यूज नेटवर्क
राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे. आज दुपारी दोन वाजता मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून त्यात उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचा शपथविधी झाला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ आणि इतर आमदारही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे
धनंजय मुंडे, आदिती तटकरे, छगन भुजबळ अनिल पाटील, धर्मरावबाबा आत्राम, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, संजय बनसोडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.दरम्यान, अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही राजभवनात दाखल झाले आहेत.दरम्यान, अजित पवार यांनी बोलावलेल्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारही मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीला दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, किरण ल्हमाटे, नीलेश लंके, धनंजय मुंडे, रामराजे निंबाळकर, दौलत दरोडा, मकरंद पाटील, अतुल बेनके, सुनील टिंगरे, अमोल मेटकरी, अदिती तटकरे, शेखर निकम, निलय नाईक, अशोक पवार, अनिल पाटील, सरोज अहिरे आदी उपस्थित होते.
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com