सांगोला येतील माध्यमिक आश्रम प्रशाला, कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय येथे आयोजित गुणवंतांचा सत्कार सोहळा व सायकल वाटप.
24 मराठी न्यूज सांगोला प्रतिनिधी
श्री बालाजी शिक्षण मंडळ बालाजी नगर या शैक्षणिक संस्थेचे संस्थापक-माजी चेअरमन स्व. लालसिंग रजपूत सर यांच्या ८३ व्या जयंती निमित्त प्राथमिक, माध्यमिक आश्रम प्रशाला, कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय येथे आयोजित गुणवंतांचा सत्कार सोहळा व सायकल वाटप कार्यक्रम माझ्या हस्ते संपन्न झाला.मंगळवेढा तालुक्यातील गाव-खेड्यांच्या ग्रामीण विकासाला आणि साक्षरतेला गती निर्माण करुन देण्यासाठी स्व. रजपूत सर यांनी बालाजीनगर या ग्रामीण भागात शैक्षणिक हबची स्थापना केली आहे. त्यांनी पाहिलेले साक्षर समाज निर्मितीचे स्वप्न अशा उपक्रमांच्या माध्यमातून साकार आणि पूर्ण होत असल्याचा मनस्वी आनंद असल्याचे मत यावेळी बोलताना मांडले.तसेच शाळेतील लांबून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण राबवत आहात ती सायकल बॅकची संकल्पना खूप सुंदर असुन ती समाजातील दानशूर व्यक्तीकडून व इतर विभागाकडून निधी उपलब्ध करून मतदार संघातील गरजू विद्यार्थ्यांना सायकल उपलब्ध करुन देण्याचा मानस व्यक्त केला.
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com