सोलापूर जिल्हा धार्मिक पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित करणार – नामदार मंगलप्रभात लोढाकेटरिंग कॉलेजला स्वामी समर्थांचे नाव
24 मराठी न्यूज पंढरपूर श्री नंदकुमार देशपांडे
सोलापूर शहर जिल्ह्यात आणि जिल्ह्याच्या बाजुला अनेक धार्मिक तीर्थक्षेत्र आहेत त्यामुळे जिल्ह्याला धार्मिक पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित करणार तसेच केटरिंग कॉलेजला श्री स्वामी समर्थांचे नाव देण्यात येणार असल्याचे राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. पर्यटन विभागाच्या वतीने केटरिंग कॉलेजच्या पदवी पदविका अभ्यासक्रमाचा शुभारंभ लोढा यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ.जयसिध्देश्वर शिवाचार्य, आ.विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, रणजितसिंह मोहिते पाटील, सचिन कल्याणशेट्टी, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पर्यटन विभागाचे संचालक डॉ. भगवतंराव पाटील, व्यवस्थापकिय संचालक श्रध्दा जोशी, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी आदी मान्यवर उपस्थित होते.ृगुरू पोर्णिमेचा मुहूर्त साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कॉलेजच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातून हॉटेल व्यवसायासाठी लागणारे चांगले मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यात पर्यटनाचा ओघ सुध्दा वाढणार आहे
असेही नामदार लोढा यांनी यावेळी सांगितले.प्रारंभी मान्यवरांचे स्वागत तुळशीचे रोप शाल श्रीफळ देवून पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी यांनी केले. त्यानंतर त्यांनी आपल्या प्रास्ताविकात बोलताना या कॉलेजच्या पहिल्या बॅचचा शुभारंभ होत आहे. आपल्या राज्यात पर्यटनासाठी येणाऱ्याचे आदरातिथ्य चांगले व्हावे,पर्यटनासाठी आलेले जास्त दिवस राहावेत यासाठी प्रशिक्षणाची गरज आहे ते प्रशिक्षण या कॉलेजच्या माध्यमातून मिळणार आहे असेही त्यांनी सांगितले. सोलापूर जिल्ह्यात धार्मिक तीर्थस्थळे मोठ्याप्रमाणात आहेत. कामगारांची संख्या अधिक आहे. याची सांगड घालून पर्यटनासाठी आलेल्यांकडून या ठिकाणी रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी. सोलापूर जिल्ह्याला धार्मिक पर्यटनाचा दर्जा मिळाल्यास रोजगारांच्या संधी आणि पर्यटनाला चालना मिळणार आहे तसेच या केटरिंग कॉलेजला श्री स्वामी समर्थांचे नाव देण्यात यावे अशी मागणी सुभाष देशमुख यांनी केली. सोलापूर मध्ये साधन साहित्याची कमतरता आहे त्यामुळे विकासाचा वेग मंदावला आहे मंत्री महोदयांनी पर्यटनाच्या दृष्टीने विशेष लक्ष देवून सोलापूर जिल्ह्याला निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी विजय देशमुख यांनी केली. सोलापूर ही योग भूमी आहे आणि या योग भूमीला धार्मिक पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित करावे अशी मागणी खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य यांनी केली. धार्मिक पर्यटनासाठी येणाऱ्यांची संख्या आणि हॉटेलची संख्या पाहून प्रशिक्षणाची गरज असल्याचे लक्षात आल्याने राज्याचे तत्कालीन पर्यटन मंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी संकल्प करून हे केटरिंग कॉलेज मंजुर केले. सोलापूर जिल्ह्याच्या धार्मिक पर्यटनासाठी दररोज जवळपास 15 ते 20 लोकांची वर्दळ असते तसेच अनेक एैतिहासिक धार्मिक स्थळे आहेत तेथील अभ्यासाच्या माहितीच्या आधारावर गाईड तयार करण्यात यावेत तसेच काही पर्यटक घरगुती राहणे पसंत करतात त्यासाठी होम स्टे मधील महिलांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे अशी मागणी आ.रणजितसिंह मोहिते पाटील यांनी केले.या सर्व लोकप्रतिनिधींच्या मागणीवरून नामदार मंगलप्रभात लोढा यांनी सोलापूर जिल्ह्याला धार्मिक पर्यटन क्षेत्राचा दर्जा लवकरच देणार असल्याचे जाहिर केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एैश्वर्या हिबारे यांनी केले तर आभार प्राचार्य चंद्रशेखर जयस्वाल यांनी व्यक्त केले. सोलापूरच्या इतिहासात आणि विकासाला नव्याने चालना मिळणाऱ्या या केटरिंग कॉलेजच्या अभ्यासक्रमाच्या शुभारंभ कार्यक्रमासाठी मोठ्याप्रमाणात नागरीकांनी गर्दी केली होती.
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com