एसटी महामंडळा कडून नियोजनाचा अभाव- प्रवाशांचे प्रचंड हाल -जादा बस सोडण्याची मध्यवर्ती कार्यालयाकडे ग्राहक पंचायची मागणी
पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर – अधिक महिन्यासाठी एसटी महामंडळाने नियोजन न केल्याने पंढरपूर बस स्थानकावर प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यासाठी राज्यातील सर्व विभागातून जादा बसेस सोडाव्यात अशी मागणी रा.प.महमंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे केली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी दिली. सध्या हिंदू धर्मियांचा पवित्र असा अधिक (पुरुषोत्तम)मास सुरू आहे. त्यामुळे सर्व तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी भाविक-भक्तांची गर्दी वाढत आहे मात्र पंढरपूर हे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असल्याने येथे प्रवाशांचे प्रमाण मोठे असणार ही शक्यता गृहीत धरून तसे नियोजन राज्य परिवहन महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाने करणे आवश्यक होते. इतर यात्रेप्रमाणे येथे फक्त काही ठराविक दिवस गर्दी न होता संपूर्ण महिनाभर प्रवाशांची ये-जा राहणार आहे, गर्दी होणार आहे हे गृहित धरून राज्यातील सर्व विभागातून विशेषत: मराठवाडा विभागातुन जादा बसेस सोडण्याची व्यवस्था करणे अपेक्षित होते मात्र तसे न झाल्याने पंढरपूर येथील बस स्थानकावर प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.महिला, वृद्ध,लहान मुले यांना याचा मोठा त्रास होत आहे त्यामुळे प्रवाशी तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. सोलापूर विभागातील गाड्यांची संख्या विचारात घेता सर्व प्रवाशांची वाहतूक ते करु शकणार नाहीत ही वस्तुस्थिती आहे. सध्या नियमित शाळा सुरू झालेल्या असल्याने विद्यार्थी वाहतुक करणाऱ्या बस कमी करता येत नाहीत. त्यामुळे मध्यवर्ती कार्यालयाने तातडीने उर्वरीत अधिक महिनाभरासाठी येथे सर्व विभागातून जादा बसेसची तातडीने सोय करावी अशी मागणी अ. भा.ग्राहक पंचायतीचे प्रांत कोषाध्यक्ष विनोद भरते,सदस्य सुभाष सरदेशमुख,जिल्हा संघटक दीपक इरकल, सचिव सुहास निकते,अण्णा ऐतवाडकर, पांडुरंग अल्लापूरकर,संतोष उपाध्ये,तालुका अध्यक्ष विनय उपाध्ये ता.उपाध्यक्ष नंदकुमार देशपांडे,संघटक महेश भोसले, सचिव प्रा.धनंजय पंधे यांनी केली आहे.
*🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com*