जय सचिन साळवे चे विविध स्पर्धा परीक्षेत यश.
पंढरपूर प्रतिनिधी
‘महर्षी वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळ, वैराग’ यांनी राज्यस्तरीय ए.टी.एस. प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन केले होते. त्यामध्ये ‘आदर्श प्राथमिक विद्यालय, पंढरपूर’ येथील इयत्ता तिसरीतील जय सचिन साळवे या विद्यार्थ्याने 300 पैकी 218 गुण मिळवून केंद्रात दुसरा येण्याचा मान पटकावला आहे. तसेच ‘भारतीय अभिरूप शिष्यवृत्ती'(I.A.S) परीक्षेत केंद्रात चौथा आलेला आहे. तसेच ‘मंथन राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षे’त 300 पैकी 220 गुण मिळवून केंद्रात सातवा व जिल्ह्यात 37 आला आहे. तसेच ‘अक्षरगंगा टॅलेंट सर्च’ परीक्षेत केंद्रात चौथा आला आहे.तसेच इंटरनॅशनल टॅलेंट सर्च परीक्षेत 300 पैकी 276 गुण मिळविले आहेत. त्याला सौ.वीणा सारंग व्होरा मॅडमचे मार्गदर्शन लाभत आहे.सदर परीक्षांचे गुणपत्रक व सन्मानचिन्ह देऊन त्याचा यथोचित गौरव करण्यात आला आहे. या सर्व यशाबद्दल त्याचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२ हा०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com