विशेष
श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीला अकोला येथील भाविकाकडून 1,00,111 रूपयाची देणगी
पंढरपूर प्रतिनिधी
कुमारी बेबीताई पुरणमाल सोनोने, अकोला या दानशुर भाविकाने आज 24 फेब्रुवारी, 2024 रोजी मंदिर समितीस 1,00,111 रूपयाची देणगी दिली आहे. त्याबद्दल त्यांचा मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख (जळगांवकर) यांच्या शुभहस्ते मंदिर समितीची दिनदर्शिका व दैनंदिनी देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. त्यावेळी मंदिर समितीचे कर्मचारी श्री.अनंता रोपळकर व भाविकाचे कुटुंब उपस्थित होते.कुमारी बेबीताई सोनोने ह्या रा.आनंदनगर,अकोला येथील रहिवाशी आहेत. त्या आपल्या कुटुंबांसमवेत श्री.विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी कै.द्रोपदाबाई पुरणमाल सोनोने यांच्या स्मरणार्थ धनादेशाद्वारे सदरची देणगी दिली आहे