अ भा क्षत्रिय नामदेव महासंघ व ३ मार्च रोजी श्री घुमान पंजाब येथे भव्य अधिवेशन
पंढरपूर प्रतिनिधी
प्रतिनिधी वारकरी संप्रदायाचे आद्य प्रचारक व भक्ती संप्रदायाच्या माध्यमातून ज्यांनी राष्ट्रीय एकात्मतेचे माहान कार्य केले पंढरपूर ते घुमान पंजाब पर्यंत भागवत धर्माचा प्रचार व प्रसार केला असे संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या कर्मभूमी श्री घुमान साहेब जिल्हा गुरुदासपूर पंजाब येथे अखिल भारतीय क्षत्रिय नामदेव महासंघ दिल्ली व भक्ती संप्रदाय यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 2 व 3 मार्च 2024 रोजी भव्य अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले असून या अधिवेशनाताची जय्यत तयारी झाली असून राष्ट्रीय अध्यक्ष डॉ नानासाहेब पाथरकर व भक्ति संप्रदायचे ह भ प रामकृष्ण बगाडे महाराज वय 98 वर्ष असताना सुध्दा संपूर्ण भारत भ्रमण करून या अधिवेशनाला येत असून भारतातील 18 राज्यातून या अधिवेशनाला 15 ते 20 हजार समाज बांधव उपस्थित राहणार आहेत. यामध्ये समाजाच्या विविध मागण्या बाबत चर्चा व निर्णय घेण्यात येणार आहेत यात समस्त शिंपी दर्जी समाज पोट जातींचे एकत्री करण करणे राष्ट्रीय स्तरावर समाज संघटन मजबूत करणे तसेच आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये समस्त समाजाची दिशा ठरविणे अशा विविध राजकीय सामाजिक विषयांवर या अधिवेशनात चर्चा निर्णय होणार आहेत प्रामुख्याने संत नामदेव महाराजांचे जयंती ही संपूर्ण भारतात शासकीय स्तरावर साजरी करणे पंढरपूर ते घुमान पंजाब पर्यत रेल्वे गाडी सूरू करने व तिला संत नामदेव श्रीनानकदेव राष्ट्रीय एकात्मता एक्सप्रेस नाव देने पंढरपुर येथील नामदेव महाराजांच्या मंदिराला केंद्र व राज्य सरकारने निधी देणे 2025 मध्ये संत नामदेव महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याला 675 वर्ष पूर्ण होत असून तो कार्यक्रम संपूर्ण भारतभर साजरी करणे या निमित्त विशेष टपाल तिकीट व चलणी नाणे प्रकाशित करणे समाजातील शिवणकाम करणाऱ्या गरीब असंघटित समाज बांधवांसाठी केंद्र सरकारने शिलाई कढाई बोर्डाची स्थापना करणे महाराष्ट्र व पंजाब कला सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करने अशा 15 विषयांवर या अधिवेशनात ठराव मंजूर करण्यात येणार या अधिवेशनास महाराष्ट्रातून अ भा क्षत्रिय नामदेव महासंघ महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अॅड महेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली 2000 समाज बांधव या अधिवेशनाला जाणार आहेत असे प्रदेश राज्य संघटक मनोज भांडारकर यांनी प्रसिद्धी पत्रका द्वारे कळविले आहे.