भरचौकात एस.टी.च्या धडकेने महिलेचा मृत्यू.
पंढरपूर येथे एस टी खाली चिरडून वृध्द महिलेचा दुर्दैवी मृत्यू.
२४’ मराठी न्यूज पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूर येथील सर्वात गजबजलेल्या सरगम चौकात आज बुधवार दी २५ जानेवारी रोजी दुपारी चार वाजता एस टी बसने एका चालत जाणाऱ्या वृध्द महिलेस धक्का दिल्याने ती पडून पुढील चाकाखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.या चौकात आज पर्यंत अनेकांचा बळी गेला आहे. तरीही वाहतूक शाखेला जाग येत नाही या चौकामध्ये दररोज वाहतूक शाखेचे पोलीस असतात मात्र वाहतूक सुरळीत करण्याऐवजी हे कर्मचारी दंडात्मक कारवाई करण्यात मग्न असतात आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. ही महिला सरगम चौकातून भोसले चौकाकडे आपल्या घरी चालत जात होती. आणि अचानक या एसटी बसची महिलेला धडक बसलेले तिच्या अंगावरून एसटीचे पुढील चाक गेले. या घटनेनंतर पोलीस प्रशासन घटनास्थळी तात्काळ आले . या महिलेचे नाव जयाबाई थिटे असे असून ही महिला पंचरत्न इंग्लिश मीडियम स्कूल सफाई कर्मचारी म्हणून काम करत होती. सरगम चौकात नेहमी वाहतुकीची कोंडी होत असते.पावसाळ्यात ब्रीज खाली पाणी साठून वाहतूक बंद पडते.अनेक मोटारसायकल चालक ब्रिजखाली पडून जखमी झाले आहेत. तर ब्रिजची उंची कमी असल्याने ट्रक सारखी अवजड वाहने अडकून पडतात.प्रशासनाच्या दिरंगाई मुळे आज एका गरीब, कष्टकरी महिलेचा काहीही दोष नसताना अपघाती मृत्यू झाल्याने प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे.
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻८२०८३०८७८७