आजाराला कंटाळून नैराश्येतुन मोहोळ मध्ये एका युवकांची आत्महत्या .
‘ 24 मराठी न्यूज,मोहोळ तालुका प्रतिनिधी ( राजेश शिंदे )
मोहोळ – दम्याच्या आणि क्षय रोगाच्या आजाराला कंटाळून मोहोळ मधील ४० वर्षाच्या तरुणाने नैराश्यातून चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार दि ३ फेब्रुवारी रोजी दुपारी १२:३० वाजण्याच्या पूर्वी घडली . सतीश आदिनाथ लवटे रा ( कुंभार खाणी ) मोहोळ असे मृताचे नाव असून मोहोळ पोलिसा कडून मिळालेल्या माहिती नुसार , मृत सतीश यास दम्याचा आणि क्षयरोगाचा आजार होता . गुरुवार दि २ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान तो घरातून औषध उपचारासाठी सोलापूर येथील श्री शिवाजी महाराज शासकीय रुग्नालयात जाऊन येतो असे म्हणून घरातून निघून गेला . दरम्यान त्याची वाट पाहून व घरी न आल्याने गुरुवारी सतीश हरवल्याची तक्रार त्याच्या नातेवाईकांनी मोहोळ पोलिसात दाखल केली होती .दरम्यान शुक्रवारी त्याने सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गा जवळील बी पी एड कॉलेज या ठिकाणी चिंचेच्या झाडाला दोरीने गळफास घेतल्याचे आढळून आले . या घटनेची खबर संतोष आदिनाथ लवटे वय ४८ रा कुंभार खाणी मोहोळ यांनी मोहोळ पोलिसात दिली असून अधिक तपास मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलिस करीत आहेत .
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻८२०८३०८७८७