बापाने पोटच्या बारा वर्षाच्या चिमुकल्याची गळा चिरून केली हत्या; मृतदेह नाल्यात फेकण्याचा प्रयत्न.
24 मराठी न्यूज नेटवर्क
अबरनाथ : अंबरनाथ स्वामी नगर परिसरात राहणाऱ्या एका बापाने आपल्याच बारा वर्षाच्या मुलाची गळा चिरून हत्या केली आहे.हत्येनंतर मृतदेह नाल्यात फेकण्याचा प्रयत्न करीत असताना स्थानिक रहिवाशांनी आरोपीला पाहिले. त्यानंतर आरोपीचा पाठलाग करून त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.स्वामी नगर परिसरात राहणारा आरोपी आनंदकुमार गणेश हा गटार आणि चेंबर साफ करायचे काम करतो. तर त्याचा मुलगा आकाश हा अंबरनाथ रेल्वे स्थानकाबाहेर भाजी विक्री करून कुटुंबाला हातभार लावण्याचे काम करीत होता. बुधवारी रात्री आनंद कुमार गणेश याने आपला मुलगा आकाश याचा गळा चिरून त्याची हत्या केली. हत्यानंतर मृतदेह नाल्यात फेकण्यासाठी जात असताना काही रहिवासीयांनी त्याला पाहिले. लागलीच काही नागरिकांनी या आरोपीचा पाठलाग करून त्याला पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. बापाने आपल्या मुलाची हत्या नेमकी का केली हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही.
*🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻८२०८३०८७८७*