हफ्ते थकल्याने चक्क दुचाकीवर नेली दुचाकी; सोशल मीडियावर व्हायरल.
24 मराठी न्यूज नेटवर्क
वैजापूर- मार्च महिनाअखेरीस सर्वत्र बँकांकडून कर्ज वसुलीसाठी कर्जदारांच्या मागे तगादा लावण्यात येत असल्याचे चित्र नेहमी पाहायला मिळते.अनेकदा थेट कारवाई देखील करण्यात येते. दरम्यान असाच काही प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळाला. एका शेतकऱ्याने कर्जावर घेतलेल्या दुचाकीचे हफ्ते थकल्याने वाहनाच्या कर्ज वसुलीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांनी त्याची दुचाकी जप्त केली आहे. मात्र जप्त केलेली दुचाकी कुण्या मोठ्या वाहनात नव्हे तर चक्क त्यांच्याच दुचाकीवर टाकून घेऊन गेल्याची घटना समोर आली आहे. ही घटना वैजापूर तालुक्यातील रोटेगाव येथे घडली. संबंधित कर्मचारी दुचाकीवर चक्क दुसरी दुचाकी घेऊन जात असल्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.याविषयी अधिक माहिती अशी की, वैजापूर तालुक्यातील रोटेगाव येथील एका शेतकऱ्याने काही दिवसापूर्वी फायनान्सवर दुचाकी विकत घेतली होती. मात्र, वेळेवर त्यांच्याकडून हफ्त्याची परतफेड न झाल्याने गुरुवारी (16 मार्च) फायनान्सचे दोन कर्मचारी रोटेगाव येथे त्या शेतकऱ्याच्या घरी गेले. यावेळी शेतकऱ्याकडे थकीत हफ्ते भरा नाहीतर दुचाकीची चावी द्या, अशी विनंती केली. मात्र, या शेतकऱ्याने पैसे भरण्यास असमर्थता दाखवली. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी दुचाकी जप्त करण्यासाठी चावीची मागणी केली. शेतकऱ्याने या कर्मचाऱ्यांनी दुचाकीची चावी दिली नाही. यामुळे त्या दोन कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्याची दुचाकी उचलून सोबत आणलेल्या दुचाकीवर टाकून ते वैजापूर फायनान्स कार्यालयाकडे निघून गेले वैजापूर शहरातील एका नामांकित खासगी वित्तीय संस्थेने तालुक्यातील शहरानजीक असलेल्या रोटेगाव येथील एका शेतकऱ्याला दुचाकी घेण्यासाठी कर्ज दिले आणि कर्जदाराने कर्जाचे हप्ते नियमित भरले होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून दुचाकीच्या कर्जापोटी साधारणत दहा हजार रुपये संस्थेचे बाकी होते. त्यावर व्याजाची रक्कमही आकारण्यात आली होती. कर्जाच्या परतफेडीची मुदत संपल्यानंतर संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित कर्जदाराकडे तगादा सुरु केला परंतु संबंधित कर्जदाराने प्रतिसाद न दिल्याने वित्तीय संस्थेने कर्मचाऱ्यांना दुचाकी जप्त करुन आणण्याचे आदेश दिले. त्यानंतर कर्मचारी दुचाकीवरुन कर्जदाराच्या घरी गेले आणि कर्मचाऱ्यांनी मागचा पुढचा विचार न करता ती दुचाकी उचलून थेट त्यांनी आणलेल्या दुचाकीवर ठेवून वैजापूर येथे संस्थेच्या कार्यालयात आणली.
*🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻८२०८३०८७८७*