गौतमी पाटील गावात येणार म्हणून चक्क सुट्टी मागणाऱ्या एसटी चालकाचा रजेचा अर्ज…
24 मराठी न्यूज नेटवर्क
सांगलीच्या तासगाव डेपोतला सदर चालक असल्याचे समोर आले आहे. मात्र धक्कादायक बाब म्हणजे ज्या नावाने हा अर्ज व्हायरल केला आहे, मात्र त्या चालकाने असा अर्ज केला आहे की नाही हे अद्याप समजू शकले नाही. तसा रजेचा तासगाव एसटी आगाराकडे करण्यात देखील आला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कोणीतरी खोडसाळपणाने अर्ज व्हायरल केल्याचे प्रकार घडला आहे. मात्र तासगावच्या एसटी विभागाकडे असा कोणत्याही प्रकारचा रजेचा संबंधित चालकाचा अर्ज देखील आला नसल्याचा समोर आला आहे. सोशल मीडियावर सांगलीच्या तासगाव एसटी डेपोतील चालकाचा रजेचा अर्ज चांगलाच व्हायरल होत आहे. या अर्जामध्ये एसटी चालकाने गावात गौतमी पाटील येणार म्हणून दोन दिवसांची रजा मागितली आहे. 22 आणि 23 मे रोजी सुट्टी मिळावी असं रजा अर्जात नमूद केलंय. पण ही सुट्टी गावात गौतमी पाटील येणार आहे म्हणून मिळावी असं मजकूर देखील या रजेच्या अर्जावर लिहिण्यात आले आहे. गौतमी पाटील गावात येणार आहे म्हणून दोन दिवसांची सुट्टी मिळावी, असा हा अर्ज असल्याने सांगलीच्या एसटी प्रशासनापासून सगळीकडे एकच उडाली आहे आणि सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अर्जावर नेटकऱ्याकडून जोरदार चर्चा रंगली आहे. मात्र, ज्या चालकाच्या नावाने हा अर्ज लिहिण्यात आला आहे. तो बोगस अर्ज आहे की खरा हे अद्याप समजू शकले नाही. तासगाव एसटी आगारामध्ये संबंधित नावाचा चालक कार्यरत आहे,मात्र त्या चालकाकडून अशा प्रकारे अद्यापतरी कोणत्याही रजेचा अर्ज हा दाखल केला गेला नाही,असं तासगाव एसटी प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचबरोबर ज्या चालकाच्या नावाने हा अर्ज व्हायरल होत आहे त्या चालकाची या अर्जाबाबत नेमकी प्रतिक्रिया काय हे अद्याप समजू शकले नाही. त्यामुळे कोणीतरी खोडसाळ पणाने हा अर्ज लिहून सोशल मीडियावर व्हायरल केल्याची शक्यता आहे.गौतमी पाटील गावात येणार म्हणून सुट्टी मागितली म्हटल्यावर गौतमीच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर संबंधित अर्ज वाऱ्यासारखा व्हायरल केला.अर्ज व्हायरल झाला पण वेगळंच सत्य समोर याबाबत तासगाव एसटी आगाराकडे संपर्क साधला असता, अशा मजकुराचा आणि कारण असलेला अर्ज एसटी विभागाकडे आलेला नाही. मात्र संबंधित एसटी चालकाकडून रजा मागण्यात आली होती. मात्र तशा प्रकारचा अर्ज त्याने एसटी प्रशासनाकडे अद्याप दिला नसल्याचं तासगाव एसटी आगाराकडून स्पष्ट करण्यात आले आहे.दरम्यान सदरच्या अर्जाबाबतीत संबंधित चालकाशी संपर्क केल्यावर याबाबतीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. चालकाने कोणत्याही प्रकारचा असा अर्ज लिहिला नाही किंवा तो एसटी प्रशासनाकडे सादर देखील केला नाही. आपल्या नावाने कोणीतरी खोडसाळपणाने हा अर्ज तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. त्या अर्जावर असणारी सही देखील बोगस असल्याचं संबंधित चालकाकडून सांगण्यात आलं आहे. सदरचा अर्ज पूर्ण खोटा असून त्यावरील त्या चालकाची सही देखील बोगस आहे आणि तासगावच्या एसटी विभागाकडे असा कोणत्याही प्रकारचा रजेचा संबंधित चालकाचा अर्ज देखील आला नसल्याचा समोर आलं आहे. मात्र सदरचा अर्ज सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे.
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶*आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com*