"This news portal adheres to the Digital Media Ethics Code, 2021, established under the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021, notified by the Ministry of Information and Broadcasting (MIB). Furthermore, it ensures compliance by submitting mandatory monthly reports to the government as stipulated.

Uncategorized

अनाथ’ मुलांना आता ‘स्वनाथ’ बनविणे आवश्यक – व्यवस्थापकीय संचालिका सौ. श्रेया भारतीय

पंढरपूर तालुका प्रतिनिधी

स्वेरीत स्वनाथ फाऊंडेशन च्या संस्थापिका सौ.श्रेया भारतीय यांचे मार्गदर्शन सत्र संपन्नपंढरपूर- ‘ज्या युवकांना समाजासाठी काहीतरी करायचे आहे त्यांनी १८ वर्षानंतर म्हणजे सज्ञान झाल्यानंतर घर सोडून आपल्या मनगटाच्या बळावर कार्य करण्याची आवश्यकता आहे. आज विविध कारणांमुळे समाजात अनाथ मुलांचे प्रमाण वाढत आहे. आई-वडिलांच्या मायेपासून वंचित राहिलेली अशी जी अनाथ मुले आहेत त्यांना आधार देणे अतिशय गरजेचे आहे. अशा अनाथ मुलांना आपुलकी, माया, ममता, प्रेम देणे गरजेचे आहे आणि त्यासाठी अशा मुलांना ‘फॉस्टर चाईल्ड’ या संकल्पनेच्या अनुषंगाने दत्तक घेऊन त्यांचे संगोपन व पालनपोषण करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र हे जास्त समृद्ध असलेले राज्य आहे, असे आकडेवारीवरून स्पष्ट दिसत असले तरी येथील मातृत्वाचा पुन्हा विचार केला गेला पाहिजे. आपण घरी आल्यावर अधिक उत्साही, आनंदी राहतो त्याचे कारण म्हणजे या ठिकाणी माया, ममता, प्रेम, उत्साह, वत्सलता, आपुलकी अशा विविध भाव-भावना असतात आणि हीच आपुलकीची भावना ‘अनाथ’ मुलांना देणे आज आवश्यक झाले आहे. अशा ‘अनाथ’ मुलांना आधार देण्यासाठी ‘स्वनाथ फाउंडेशन’ची निर्मिती केली असून देशात शासकीय व अशासकीय असे असंख्य ‘अनाथ आश्रम’ कार्यरत आहेत पण शासकीय क्षेत्रात मायेचा आधार, ममता, मातृत्व, आधार मिळेलच असे सांगता येत नाही. अनाथ मुलांना काळजी आणि संरक्षणाची गरज आहे ते त्यांना दिले गेले पाहिजे. अनाथ मुलांना प्रेम मिळाले तर ते मुळीच अनाथ राहणार नाहीत. ज्याप्रमाणे गोपाळपूरचे महत्त्व पंढरपूर एवढे आहे कारण वारकरी हे गोपाळकाला पूर्ण केल्याशिवाय परतत नाहीत त्याप्रमाणे अनाथ मुलांना आता स्वनाथ बनवल्याशिवाय आपल्या जीवनाचे सार्थक होणार नाही. आपण सर्वजण आपल्या आयुष्यात ‘अनाथ मुलांना स्वनाथ बनवूया’ असा संकल्प करा.’ असे आवाहन स्वनाथ फाऊंडेशनच्या संस्थापिका व व्यवस्थापकीय संचालिका सौ. श्रेया भारतीय यांनी केले. गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट अंतर्गत असलेल्या अभियांत्रिकी व फार्मसीच्या (पदवी व पदविका) या चारही महाविद्यालयात आयोजिलेल्या या प्रेरणादायी मार्गदर्शन सत्रात ‘स्वनाथ फाऊंडेशन’च्या संस्थापिका व व्यवस्थापकीय संचालिका सौ. श्रेया भारतीय हया मार्गदर्शन करत होत्या. ‘ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनुभवण्याचा योग आला आहे आज असं वाटतंय’ हा मेसेज स्वनाथ फाऊंडेशनच्या सौ.भारतीय यांनी विद्यार्थ्यांना संदेश फलकाद्वारे दिला. दीपप्रज्वलनानंतर प्रास्ताविकात स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांनी स्वेरीची वाटचाल सांगताना केलेले परिश्रम आणि त्या प्रयत्नांना मिळालेले अभूतपूर्व यश यायाबत सांगितले. स्वेरीतील विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेत वाढ करण्यासाठी विविध क्षेत्रातील प्रेरणादायी मान्यवरांना आमंत्रित केले जाते. यावेळी स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे म्हणाले की, ‘आपल्या कार्याची नकळत नोंद होत असते. यासाठी प्रामाणिक कार्य करण्याची नितांत गरज असते. स्वेरीमध्ये इतरांपेक्षा वेगळे शिक्षण देणे हीच खरी ताकद बनली आहे आणि हीच ताकद भक्कम पाया तयार करते. त्यामुळे अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.’ असे सांगून मागील २५ वर्षांच्या शैक्षणिक वाटचालीचा लेखा जोखा सादर केला. पुढे बोलताना ‘स्वनाथ फाऊंडेशन’च्या सौ. भारतीय म्हणाल्या की, ‘ग्रामीण भागाच्या ठिकाणी एवढे मोठे शैक्षणिक विश्व निर्माण होईल असे वाटले नव्हते. खरंच हे सर्व अद्भुत आहे. विद्यार्थ्यांना करिअर करताना त्यांना चांगली दिशा देणे हे कठीण काम डॉ.रोंगे सरांच्या टीम कडून उत्तमप्रकारे होत आहे. डॉ. रोंगे सरांचे सामाजिक योगदान हे मनाला आनंद देऊन जाते. त्यामुळे स्वेरीत आल्यानंतर आपल्या परिवारात आल्याचा भास होतो. पुर्वी स्वेरीबद्धल खूप ऐकून होते पण आज प्रत्यक्ष अनुभवले. खरं तर स्वयंसेवक हा पडद्यामागे राहून काम करत असतो. या ठिकाणी स्वयंसेवकाना देखील खूप आत्मीयतेने सन्मानित केले जाते हेही समजले. स्वेरीतील प्रेरणादायी कार्यामुळे जीवनात वेगळेपण येते. या ठिकाणी संत महात्म्यांनी खूप चांगले कार्य केले असून आपल्या संतवाणीतून चांगले विचार समाजाला दिले आहेत. विठोबा, वैष्णव आणि भारतीय समाज यात कोणीही वंचित नाही. त्यामुळे पंढरपूरचे महत्त्व साता समुद्रपार गेले आहे असे असताना ‘अनाथ’ हा शब्द कोठून आला? पुराणातील अनेक ऋषीमुनी हे अनाथ होते पण ते दुर्दम्य इच्छाशक्ती बाळगणारे व समाजाला योग्य दिशा देणारे संत महात्मा होते. त्यामुळे त्यांना ‘अनाथ’ म्हणता येणार नाही. संत भगवान, श्रीकृष्ण यांचेही कार्य पहा.’ असे सांगून त्यांनी संस्कृत भाषेच्या अनेक श्लोकांचे महत्व पटवून सांगितले. तसेच पंढरपुराचे महत्व सांगताना सौ. भारतीय ह्यांनी वासुदेव जोशी यांच्या कार्यावर विशेष प्रकाश टाकला. स्वेरीच्या अदभूत कार्याचा गौरव म्हणून स्वनाथ फाऊंडेशनच्या संस्थापिका व व्यवस्थापकीय संचालिका सौ. श्रेया भारतीय यांनी स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांचा स्वनाथ फाऊंडेशन तर्फे स्मृतिचिन्ह देऊन गौरव केला

यावेळी पंढरपूर अर्बन बँकेच्या व्हाईस चेअरमन सौ. माधुरी जोशी, सौ. मानसी साठे तसेच स्वेरीचे युवा विश्वस्त प्रा.सुरज रोंगे, बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ.मिथुन मणियार, डिप्लोमा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.एन. डी. मिसाळ, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतिश मांडवे यांच्यासह अधिष्ठाता, प्राध्यापक व चारही महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते. सांस्कृतिक कार्यक्रमाचे विभागप्रमुख डॉ.यशपाल खेडकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

स्वेरीत प्रेरणादायी मार्गदर्शन सत्राचे उदघाटन करताना स्वनाथ फाऊंडेशनच्या संस्थापिका व व्यवस्थापकीय संचालिका सौ. श्रेया भारतीय, सोबत स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे, युवा विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, विभागप्रमुख डॉ. दीप्ती तंबोळी, विभागप्रमुख डॉ. एम.एम.पवार, सौ. मानसी साठे, बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ.मिथुन मणियार व आदी तसेच विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना स्वनाथ फौडेशनच्या संस्थापिका व व्यवस्थापकीय संचालिका सौ. श्रेया भारतीय.

🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!