दृश्यम चित्रपट 3.0′ खून करून मृतदेह जमिनीत पुरला, पण एका तरुणाने पाहिले, अखेर..
24 मराठी न्यूज नेटवर्क
दोन व्यक्ती एका तरुणाचा खून करतात आणि त्याचा मृतदेह जमिनीत गाडून टाकतात. हा सर्व प्रकार गावातला आणखी एक तरुण बघतो. आपण गुन्हा करत असताना कुणीतरी बघितल्याचं समजताच गुन्हेगार व्यक्ती या साक्षीदाराला जीवे मारण्याची धमकी देतात.त्यामुळे साक्षीदार तरुण आपलं तोंड बंद ठेवतो; पण गप्प राहून आपणही मोठा गुन्हा करत असल्याचा सल या साक्षीदार तरुणाच्या मनात असतो. साधारण अडीच वर्षांनंतर हा तरुण खून झालेल्या तरुणाच्या कुटुंबीयांना झाल्या प्रकाराची माहिती देतो. त्यानंतर शोधमोहीम हाती घेतली जाते अन् मृत तरुणाचा सांगडा हाती लागतो. एखाद्या चित्रपटाचं कथानक शोभावं अशी ही घटना आहे. झारखंडमधल्या गुमला शहरात ही घटना प्रत्यक्षात घडली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, जमिनीखालून बाहेर काढण्यात आलेला सांगाडा राजा रजक नावाच्या तरुणाचा असून, तो सुमारे अडीच वर्षांपूर्वी अचानक बेपत्ता झाला होता. गुमला शहरी पोलीस स्टेशन हद्दीतल्या चटर सरना टोली वसाहतीमध्ये ही घटना घडली. या खून प्रकरणाचा पर्दाफाश करणाऱ्या तरुणाचं नाव निरंजन कुजूर उर्फ चरका असं आहे.निरंजनच्या सांगण्यावरून पोलिसांनी 22 डिसेंबर रोजी दंडाधिकार्यांच्या उपस्थितीत घटनास्थळी खोदकाम केलं होतं; पण पोलिसांना काहीही आढळलं नाही. त्यानंतर निरंजन कुजूरने मृताच्या कुटुंबीयांशी बोलून पुन्हा खोदकाम करण्याची विनंती केली. त्यामुळे पाच दिवसांनी मृत तरुणाच्या कुटुंबीयांनी त्याच ठिकाणी खोदकाम केलं. त्यांना मानवी सांगाड्याचे काही भाग सापडले. ही माहिती पोलिसांना देताच पोलिसांनी पुन्हा खोदकाम हाती घेऊन सांगाड्याचे उर्वरित भाग शोधले. हा सांगाडा फॉरेन्सिक तपासणी आणि पोस्टमॉर्टेमसाठी रिम्समध्ये (RIMS) पाठवण्यात आला.या प्रकरणातील साक्षीदाराने दिलेल्या माहितीनुसार, अडीच वर्षांपूर्वी 20 जून रोजी गावातला परमकुमार लाहिरी आणि गणेश महतो यांनी मिळून राजा रजकचा खून केला होता. तिघांनी दारू पिऊन आपापसात भांडण केलं होतं. या भांडणादरम्यान परमकुमार आणि गणेशने राजाचा धारदार शस्त्राने खून केला आणि मृतदेह जमिनीत गाडून टाकला. निरंजन कुजूर हा या घटनेचा साक्षीदार होता. त्याने या घटनेची कुठे वाच्यता केल्यास त्याला व त्याच्या दिव्यांग पालकांना जिवे मारण्याची धमकी आरोपींनी दिली होती. यामुळे तो गप्प बसला होता. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही अशी सूत्र करून मिळालेली माहिती नुसार
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com