24 मराठी न्यूज विजापूर प्रतिनिधी
विजयपूर, दि. २९ जानेवारी-तीन लहान मुलांसह आईनेही आत्महत्या केल्याची घटना विजयपूर जिल्ह्यातील तिकोटा तालुक्यातील विठ्ठलवाडी तांडा येथे घडली आहे. एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेने विठ्ठलवाडी तांडी व परिसरात शोककळा पस- रली आहे.गीता रामू चव्हाण (वय-३२), सृष्टी चव्हाण (वय-६), समर्थ चव्हाण (वय-४), किसन चव्हाण (वय-३) असे मृत पावलेल्यांची नावे आहेत. शनिवारी रात्री गीताचे पती रामू बरोबर भांडण झाले होते. भांडणानंतर गीता तीन मुलांसह घराबाहेर पडली. त्यानंतर तिने विहिरीत तीन मुलांसह उडी मारुन आत्महत्या केली.. या घटनेनंतर तातडीने तिकोटा पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पाहणी करून याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.