पंढरपूरच्या तरुणाचा कराडमध्ये खून,एक खून दोन मृत्यू असा वेगळाच आणि धक्कादायक प्रकार उघडकीस.
पंढरपूरच्या तरुणाचा कराडमध्ये खून! एक खून, दोन मृत्यू ! खून करून फेकले आंबोली घाटातील दरीत .... मृतदेह फेकताना मारेकऱ्याचाही तोल गेल्याने झाला मृत्यू!
२४’ मराठी न्यूज नेटवर्क
पंढरपूर येथील एका तरुणाचा सातारा जिल्ह्यात खून करून अंबोली घाटात फेकले परंतु एक खून दोन मृत्यू असा वेगळाच आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.गुन्हेगारीच्या घटना रोज घडतात पण ही घटना इतर घटनांपेक्षा वेगळी ठरली आहे. खून करून एका तरुणाचा जीव घेतला गेलाच पण पुरावानष्ट करताना हल्लेखोराचाही मृत्यू झाल्याची बाब उघडकीस आली. शिकाऱ्याचीही कधी कधी शिकार होते अशी घटना या प्रकरणात घडली आहे. दोघांचा मृत्यू झाल्यानंतर तिसऱ्या साथीदाराने याबाबत माहिती दिल्याने सगळेच बिंग फुटले गेले आहे. पैशाच्या वादातून हा खुनाचा प्रकार झाला आणि पुरावा नष्ट करण्याच्या नादातून खून करणाऱ्याचाही जीव आंबोली येथील घाटातील दरीत गेला आहे. या घटनेने सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दोघांचाही मृत्यू झाल्यावर सोबत असलेल्या तिसऱ्या व्यक्तीने हल्लेखोराच्या कुटुंबियांना ही माहिती दिली आणि त्यानंतर या धक्कादायक घटनेची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली गेली.सातारा जिल्ह्यातील कराड येथील भाऊसाहेब माने याने पैशाच्या कारणावरून पंढरपूर येथील सुशांत खिलारे याला कराड येथे बोलावून घेतले.
वीट कामगारांचा पुरवठा करण्यासाठी माने आणि खिलारे यांच्यात आर्थिक व्यवहार होत होते. लाखोंचा हा व्यवहार होता परंतु माने याने खिलारे याला दिलेली रक्कम तो परतही देत नव्हता आणि त्या मोबदल्यात ठरलेले काम देखील तो करीत नव्हता. याचा राग भाऊसाहेबमाने याला होता. त्यातून ही घटना घडली आहे.माने याने खिलारे यास पैशाबाबत विचारणा केली. यावेळी माने याचा कराड येथील एक मित्र तुषार पवार हा देखील उपस्थित होता. पैशाची विचारणा केल्यावर त्यातून माने आणि खिलारे यांच्यात वादावादी सुरु झाली.
माने याने सुशांत खिलारे याला प्रचंड आणि बेदम मारहाण केली. या मारहाणीत सुशांत खिलारे याचा मृत्यू झाला. सुशांत खिलारे याचा मृत्यू झाल्यानंतर मात्र माने आणि पवार या दोघांचीही घाबरगुंडी उडाली. माने याला होता. त्यातून ही घटना घडली आहे.सुशांतचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच त्याला एका खोलीत बंदिस्त करण्यात आले. पुरावा नष्ट करण्याचा विचार झाला आणि सुशांत याचा मृतदेह घेवून ते सोमवारी एका कारमध्ये मृतदेह घेऊन तुषार आणि माने सावंतवाडी येथील अंबोली घाटात पोहोचले. घाटातील दरीत मृतदेह फेकून पुरावा नष्ट करण्याचे नियोजन त्यांनी केले होते. रात्रीच्या अंधारात ते धबधब्यापासून एक किलोमीटर अंतरावर गेले आणि थांबले. घाटात कार आल्यावर गाडी चालून ठेवून त्यांनी मृतदेह बाहेर काढला आणि दरीत फेकून देवू लागला. संरक्षक कठड्यावरून सुशांतचा मृतदेह दरीत फेकताना मृतदेह दरीत फेकला गेलाच पण यावेळी भाऊसाहेब माने याचाही त्यावेळीच तोल गेला आणि तो देखील दरीत फेकला गेला. सोबत असलेला तुषार माने मात्र यातून बचावला गेला. तुषार याने या घटनेची माहिती माने याच्या कुटुंबाला दिली.या सर्व प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाल्यावर पोलिसांनी घाटात धाव घेतली. दरीत दोघांचाही मृत्यू झालेला दिसला. पोलिसांनी रेस्क्यू टीमच्या मदतीने दोन्ही मृतदेह बाहेर काढले. पंढरपूर येथील २८ वर्षाचा तरुण सुशांत खिलारे आणि कराड येथील ३० वर्षीय भाऊसाहेब अरुण माने या दोघांचे मृतदेह पोलिसांना या दरीत आढळले. मृतदेह खाली फेकताना तोल गेलेल्या माने हा दीडशे फुट खोल दरीत कोसळला. दरीत असलेल्या खडकावर माने याचे डोके आपटल्यामुळे तो जागीच ठार झाला. तिसरा व्यक्ती तुषार पवार याने याबाबत घडलेली नेमकी माहिती पोलिसांना दिली. त्यामुळे या घटनेचा पूर्ण उलगडा होऊ शकलातीन लाखांचा व्यवहार !वीट भट्टीसाठी कामगार पुरविण्याचे काम पंढरपूर येथील मयत तरुण सुशांत खिलारे हा करीत होता. भाऊसाहेब माने आणि तुषार पवार यांचा वीटभट्टीचा व्यवसाय आहे. त्यामुळे त्यांना कामगार पुरविण्याची जबाबदारी शुशांत याने घेतली होती. त्यासाठी माने याच्याकडून सुशांत याने तीन लाख रुपये घेतले होते. त्यानंतर सुशांत याने कामगारही पुरवले नाहीत आणि त्यांचे पैसे परतही केले नाहीत त्यामुळे माने हा संतापला होता. माने आणि पवार याने पंढरपूर गाठले आणि सुशांतला गाडीत घालून कराड येथे नेले. आठवडाभर त्याला माने याच्या घरात डांबून ठेवण्यात आले आणि रविवारी दारू पिऊन त्याला मारहाण झाली त्यात त्याचा मृत्यू झाला अशी माहिती सूत्राकडून मिळालेले.
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻८२०८३०८७८७