शासनाने दुष्काळ ग्रस्त यादीतून पंढरपूर-मोहोळ-मंगळवेढ्यास वगळले तर शेतकऱ्यांना सोबत घेत उग्र आंदोलन करणार :-संभाजी शिंदे
जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचा इशारा
पंढरपूर तालुका प्रतिनिधी
राज्य शासनाने नुकतेच राज्यातील दुष्काळग्रस्त 40 तालुक्यांची यादी जाहीर करीत या तालुकयांना मिळाणार्या संभाव्य लाभाची माहीती शासनाकडून देण्यात आली आहे.मात्र या दुष्काळ प्रवण तालुक्याच्या यादीत पंढरपूर-मंगळवेढा -मोहोळ तालुक्याचा समावेश नाही.वास्तविक पाहता यावर्षीच्या मान्सुन कालवधीत या तालुकयात अतिशय अल्प प्रमाणात पाऊस झाला आहे. ऊजनी धरण केवळ 60 टक्के इतकेच भरले आहे.अशातच नुकतेच पालकमंत्री चंद्रकात पाटील यांच्या उपस्थिीतीत पार पडलेल्या उजनी धरण पाणी नियोजन बैठकीत देण्यात आलेल्या आकडेवारी नुसार उजनी धरणात अगदी फेब्रवारी 2024 मध्येच वजा 27 टक्के इतक्या अल्प प्रमाणात पाणी साठा शिल्लक राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.त्यामुळे एकीकडे खरीब हंगाम हतचा गेला असतानाच या तालुक्यातील शेतकर्यांना रब्बी हंगाम तसेच चारा आणि पाणी टंचाईचा मोठा सामना करावा लागणार आहेया गंभीर परिस्थीतीची दखल घेत त्वरीत हे तालुके दुष्काळगस्त तालुक्याच्या यादीत समाविष्ट करा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून प्रांताधिकारी पंढरपूर यांना निवेदन देत केली असून शासनाने याची दखल न घेतल्यास प्रत्येक प्रांत कार्यालयासमोर उग्र आंदोलन करू तसेच जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढू असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी दिला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आज पंढरपूरचे प्रांताधिकारी गजानन गुरव यांना निवेदन देत या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे.यावेळी बोलताना जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी पंढरपूर-मोहोळ-मंगळवेढा आणि माढा या चारही मतदार संघाचे लोकप्रतिनिधी निद्रिस्त असल्यानेच शासनाने या चारही मतदार सघात समाविष्ट असलेल्या शेतकर्यांवर व सर्वससामान्य जनतेवर मोठा अन्याय केला आहे.अनेक महत्वुर्ण सवलतीस हे तालुके मुकले आहेत असे सांगत आमदार शहाजीबापू पाटील यांनी पंढरपूर तालुक्यातील त्यांच्या मतदार संघात समाविष्ट असलेल्या भाळवणी गटाकडेही दुर्लक्ष केल्याने संताप व्यक्त केला. उपजिल्हा प्रमुख सुधीर अभंगराव,पंढरपूर शहर प्रमुख रवी मुळे,जयवंत माने,रणजीत बागल,बंडू घोडके,उपशहर प्रमुख तानाजी मोरे,युवा सेना तालुका प्रमुख योगेश चव्हाण,उपशहर प्रमुख पोपट सावंतराव,महीला आघाडी शहर प्रमुख पुर्वा पांढरे,तालुका प्रमुख संगीता पवार,उपशहर प्रमुख उषा मोहीकर,रेहाना आतार,ग्राहक आघाडीचे सिध्दनाथ कोरे,संघटक बंडू सिध्देश्वर घोडके,शरीफा पठाण,उपतालुका प्रमुख अर्जुन भोसले,महंमद पठाण,उमेश काळे,गटप्रमुख शिवाजी जाधव,गट प्रमुख सुधाकर माळी,विठ्ठलचे संचालक दिनकर चव्हाण,विजय बागल,सोमनाथ अनपट,अंकुश साळुंखे,रोपळे विभाग प्रमुख बाळासाहेब पवार,विभाग प्रमुख दत्ता कोळेकर,विभाग प्रमुख नागेश रितुंड,शाखा प्रमुख बोहाळी संजय पवार,शाखा प्रमुख बाभळगाव नामदेव चव्हाण,संतोष कदम शाखा प्रमुख नांदोरे,दत्तात्रय भिंगारे उपप्रमुख,माजी उपतालुका प्रमुख इंद्रजीत गोरे,युवा सेना जिल्हा समन्वयक फिरोज तांबोळी,स्वप्नील गावडे,न्उपशहर प्रमुख लंकेश बुराडे,युवासेना समन्वयक करकंब रणजीत कदम,करकंब विभाग प्रमुख विजय नलवडे,करकंब शहर प्रमुख दत्ता पेठकर,सचिन मोरे करकंब युवा सेना प्रमुख,अमोल बोडके उपप्रमुख,रुषीकेश कवडे करकंब,शालन जानराव,अमित गायकवाड,ग्रामपंचयात सदस्य पोपट इंगोले,जयसिंग पवार,हरिभाऊ गाजरे,दादा आसबे यांच्यासह शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com